अमरावती जिल्हा परिषद शिक्षक भरती २०२५ – कंत्राटी पदांसाठी ऑफलाईन अर्ज करा
By MAH Nokari
मानधन / पगार
२०,०००/-
शैक्षणिक पात्रता
D.Ed
वयोमर्यादा
-
शेवटची तारीख
2025-09-30

शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी शिक्षक पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही पदभरती होत आहे. पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२५ आहे.
भरतीचे तपशील
| घटक | माहिती |
| संस्था | शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद अमरावती |
| पदाचे नाव | कंत्राटी शिक्षक (इयत्ता १ ते ८) |
| अर्ज पद्धत | ऑफलाईन |
| अर्ज समाप्तीची तारीख | ३०-०९-२०२५ |
| अधिकृत संकेतस्थळ | www.zpamravati.gov.in |
वयोमर्यादा
- वयोमर्यादेचे तपशील अधिकृत जाहिरातीत (संकेतस्थळावर) उपलब्ध आहेत.
शैक्षणिक पात्रता
- इयत्ता १ ली ते ५ वी: D.Ed/ D.EL.ED सह TET/CTET पेपर-१ उत्तीर्ण आवश्यक आहे.
- इयत्ता ६ वी ते ८ वी: संबंधित विषयातील पदवी आणि D.Ed/B.Ed सह TET/CTET पेपर-२ उत्तीर्ण आवश्यक आहे.
- TAIT परीक्षा: D.ed/B.ed+TAIT+TET/CTET उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
मानधन / पगार
- निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹ २०,०००/- इतके एकत्रित मानधन दिले जाईल.
निवड प्रक्रिया
- ही भरती पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची असून, नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत किंवा शैक्षणिक सत्र २०२५-२६ पर्यंत असेल.
- निवड रद्द करण्याचा किंवा बदल करण्याचा अधिकार प्रशासनाकडे राखून ठेवला आहे.
- पात्र उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.
महत्त्वाचे लिंक्स
| Important Links | Action |
| PDF जाहिरात व अर्ज | 👉 येथे क्लिक करा |
| अर्ज सादर करण्याचे ठिकाण | 👉 शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, अमरावती. |
🔔
सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
तुमच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी शोधा
तुमची पात्रता निवडा आणि पात्र नोकऱ्यांची यादी येथे पहा.